बीड । गेल्या काही दिवसापासून फरार असलेला भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला अखेर अटक करण्यात आली आहे. खोक्या भोसलेला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेने ढाकणे पिता-पुत्रांना अमानुष मारहाण केली होती. यानंतर सतीश भोसलेविरोधात शिरूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच गेल्या सहा दिवसांपासून सतीश भोसले फरार होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती.
सतीश भोसलेला शोधून काढण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. आज सकाळी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून पोलिसांनी खोक्याला अटक केली. बीड पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या. सतीश भोसलेला आता बीडमध्ये आणण्यात येणार आहे.
दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याने ढाकणे पितापुत्राला अमानुष माराहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला. त्यानंतर सतीश भोसलेचे दहशत माजवणारे अनेक व्हिडीओ समोर आले. सतीश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने दहशत माजवण्यासाठी अनेक कृत्य केली आहेत.
Discussion about this post