जळगाव | पूर्णा नदीवरील खामखेडा पूल बांधकाम स्थळाची पाहणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोले आणि जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. राजू लोखंडे यांनी केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने पूल परिसरात पूर्वतयारीचा आढावा घेतला. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढून निर्माण होणाऱ्या संकटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
या पाहणी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व सिंचन विभाग यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी प्रांताधिकारी, भुसावळ, तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.नरवीरसिंग रावळ, सिंचन विभागाच्या श्रीमती कुलकर्णी, तसेच पूल बांधकाम कंत्राटदार श्री. अग्रवाल हे अधिकारी उपस्थित होते.
नागरिक व शेतकऱ्यांना प्रशासनाची विनंती आहे की, पावसाळ्यात पूर्णा नदीच्या काठच्या परिसरात खबरदारी घ्यावी, नदीपात्रात अनावश्यकपणे प्रवेश करू नये आणि प्रशासनाच्या सूचना, इशारे याकडे लक्ष द्यावे.
जिल्हा प्रशासन संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सज्ज असून, वेळेपूर्वीची पाहणी आणि विभागांतील समन्वय हेच प्रभावी आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य आधार आहेत.
Discussion about this post