कझाकिस्तानमध्ये विमान अपघाताची मोठी बातमी समोर आलीय. कझाकिस्तानच्या अकताऊ शहरातील एअरपोर्टवर लँडिंगदरम्यान विमान कोसळले. या विमानातून ७० पेक्षा अधिक प्रवासी होते. विमानाला मोठी आग लागली. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य युद्धपातळीवर केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाला जाणारे विमान अकताऊ एअरपोर्टवर कोसळलं.आणि विमानाला मोठी आग लागली. या दुर्घटनेमध्ये किती प्रवासी जखमी झाले आहेत याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आली नाही. पण या घटनेमुळे अकताऊ एअरपोर्टवर खळबळ उडाली आहे
BREAKING: Azerbaijan Airlines flight traveling from Baku to Grozny crashes in Aktau, Kazakhstan, after reportedly requesting an emergency landing pic.twitter.com/hB5toqEFe2
— RT (@RT_com) December 25, 2024
कझाकिस्तानच्या मीडियाने आरोग्य मंत्र्यांच्या हवाल्याने सांगितले की, एका लहान मुलासह १२ प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. या सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तज्ज्ञ, ट्रॉमाटोलॉजिस्ट, न्यूरोसर्जनसह सर्व बचाव पथके घटनास्थळी पाठवली आहेत. एअर ॲम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. घटनास्थळी मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.
रशियाला जाणाऱ्या एम्ब्रेअर 190 एएचवाय 8243 या विमानाला पक्षी धडकल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे विमानाच्या पायलटने आपत्कालीन लँडिंगसाठी अकताऊ एअरपोर्टशी संपर्क साधला. पण विमान उतरण्याआधीच स्टेअरिंग बिघडल्याने ते कोसळले आणि विमानाला आग लागली. विमानाला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Discussion about this post