मुंबई । जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला सुटली असून त्यामुळे येथून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सगळ्याचे लक्ष लागून होते. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विशेष उन्मेष पाटील यांनी कट्टर समर्थक कारण पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. आधी ठाकरे गटात पवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांना जळगावमधून उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांना उमेदवारी जाहीर करताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Discussion about this post