अमळनेर । येथील रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या कन्या जन्मोत्सव अभियानांतर्गत आज दि. २० जानेवारी रोजी डॉ. भूषण पाटील यांच्या दवाखान्यात नुकत्याच जन्मलेल्या दोन कन्यांचे व त्यांच्या मातांचे सॅनिटरी बेबी किट आणि साहित्य देवून स्वागत करण्यात आले.
थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त हाती घेतलेल्या या अभियानाचा उद्देश हा स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी समाजात जनजागृती करणे आहे.अमळनेर शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी हा कन्या जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी डॉ. भूषण पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रतीक जैन, रोटे. राजेश जैन, रोट. अभिजित भांडारकर, प्राचार्य डॉ. पी.एस. पाटील, अभियान प्रमूख प्रा. विजयकुमार वाघमारे, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ.भरत खंडागळे तसेच MSW चे विद्यार्थी वैशाली पाटील, पूनम पाटील, शाम पाटील आणि उमेश पाटील उपस्थित होते. या नाविण्यपूर्ण सामाजिक अभियानांतर्गत आतापर्यंत २४ कन्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आलाअसून या उपक्रमाचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात येत आहे.
अभियानाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ अमळनेरचे सर्व पदाधिकारी तसेच प्रा. धनराज ढगे, प्रा.डाॅ. एस. आर. चव्हाण, प्रा.डाॅ.अनिता खेडकर,प्रा.डाॅ.श्वेता वैद्य, प्रा.डाॅ. जे.एस.सोनवणे, अधिक्षक अनिल वाणी व सर्व कर्मचारी वृंदानी सहभाग घेतला.
Discussion about this post