सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठी पदभरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार KDMC च्या www.kdmc.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५ आहे. एकूण ४९० जागांसाठी ही भरती आहे.
कोणती पदे भरली जाणार?
फिजीओथेरपीस्ट, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर), अग्निशामक (फायरमन), कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधिक्षक, उद्यान निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, लेखा लिपीक, आया (फिमेल अटेंन्डंट).
शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक गोष्टी जाहिरातीत दिलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी ३ जुलै २०२५ रोजी रात्री ११.५५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या ७ दिवस आधी मिळतील. परीक्षेची तारीख KDMC च्या वेबसाइटवर दिली जाईल.
परीक्षेसाठी शुल्क खालीलप्रमाणे आहे:
– खुला प्रवर्ग: रु. १०००/-
– मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग: रु. ९००/-
– माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक: परीक्षा शुल्क माफ
वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरू शकता. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज आणि शुल्क भरावे लागेल. उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परिक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
Discussion about this post