मुंबई । जून महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी आली आहे. प्रत्येक आर्थिक वर्षापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुट्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. आरबीआयने जारी केलेल्या यादीनुसार जून महिन्यात बँकांना मोठी सुट्टी असणार आहे. 10 दिवस बँका बंद राहतील. तथापि, या सुट्ट्या राज्य आणि शहरांनुसार बदलतात. अशा स्थितीत तुम्हाला जूनमध्ये बँकेशी संबंधित कोणत्याही कामासाठी शाखेत जावे लागत असेल, तर तुम्ही यादी पाहून घरी निघालेले बरे.
जूनमध्ये बँका कधी बंद राहतील?
जून 2024 मध्ये 10 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. 3 दिवसांच्या सरकारी सुट्ट्यांसह बँका 5 रविवार आणि 2 शनिवारी बंद राहतील. महिन्याची सुरुवात सुट्टीने होणार आहे. बँकेच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचा व्यवहार करू शकता.
बँका कधी बंद राहणार?
2 जून : रविवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
8 जून : दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
9 जून : रविवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
15 जून : राजा संक्रांतीनिमित्त आयझॉल आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
16 जून : रविवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
17 जून : बकरीद/ईद-अजहानिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
18 जून: बकरीद/ईद-अजहानिमित्त जम्मू-काश्मीरमधील बँका बंद राहतील.
22 जून : चौथ्या शनिवारी देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.
23 जून : रविवारमुळे देशभरातील बँका बंद आहेत.
30 जून : रविवारी देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.
Discussion about this post