सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. खरंतर बँकापासून ते रेल्वे आणि डीयू अशा अनेक विभागात वेगवेगळ्या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु झालेली आहे. या पदांसाठी अर्जाच्या अंतिम तारखेपासून ते पात्रता आणि अर्ज भरण्याच्या सर्व प्रक्रियापर्यंत सर्व काही उमेदवारांसाठी वेगळे आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे तपशील पाहू शकता.चला तर सर्व भरतीप्रक्रिया बद्दल माहिती जाणून घेऊयात.
इंडियन बँक भरती २०२४
सध्या इंडियन बँकने तेथील स्थानिक अधिकारी ३०० पदांसाछी अर्जप्रक्रिया सुरु केली आहे.यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०२४ आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ”indian bank.in”या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल शिवाय या भरतीप्रक्रियेची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. या पदांसाठी प्रात्र झालेल्या उमेदवारांना ४८,००० ते ८५,००० पर्यंत प्रति महिना पगार असेल.
डीयू सहाय्यक प्राध्यापक भरतीप्रक्रिया २०२४
दिल्ली विद्यापीठात विविध महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरतीप्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरतीप्रक्रियासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइला भेट देऊ शकता. ज्या उमेदवारांची पदवी पूर्ण झालेली आहे शिवाय ज्यांची पीएचडी कोर्स पूर्ण झालेला आहे,असे उमेदवार या भरतीप्रक्रियासाठी अर्ज करु शकतात.या भरतीप्रक्रियासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ आणि २६ ऑगस्ट २०२४ असून या भरतीप्रक्रियासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येतील. या भरतीप्रक्रियेनंतर उमेदवारांची निवड झाल्यानंतर साधारण पगार ५७ ते तब्बल १,८२,००० रुपये इतका असेल.
आरआरसी एनआर भरती २०२४
सद्या रेल्वे रिक्रूटमेंट सेल, नॉर्दर्न रिजनने शिकाऊ पदांसाठी तब्बल ४०९६ इतके अर्ज मागवले आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली असून अंतिम तारीख ”16सप्टेंबर२०२४”आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ”rrcnr.org”या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.यासाठी फक्त ”१५ ते २४” वर्षांतील उमेदवारांना अर्ज करण्यात येऊ शकतात शिवाय यासाठी ‘ITI’या शाखेली उमेदवार अर्ज (application)करु शकतात.
रेल्वे पॅरामेडिकल भरती २०२४
भारतीय रेल्वेने विशेष भरतीप्रक्रिया सुरु केलेली आहे. यामध्ये भारतीय रेल्वेच्या पॅरोमेडिकल विभागात १३७६ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइनच अर्ज करण्यात येणार आहे.ज्यासाठी उमेदवारांना भारतीय रेल्वेच्या ”railway.gov.in”या अधिकृत वेबसाइटवरजावे लागेल.यामध्ये विविध पात्रताही पदानुसार बदलणार आहेत.यासाठी उमेदवार १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.
Discussion about this post