मुंबई : रिझर्व्ह बँकेने जुलै महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी घोषित केली आहे. या महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद असतील. यामध्ये प्रत्येक रविवारीसह दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी येणाऱ्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सण, धार्मिक उत्सव आणि प्रादेशिक महत्त्वाच्या दिवशी सुट्ट्या दिल्या जात असल्यामुळे सुट्ट्यांचे दिवस राज्यानुसार बदलू शकतात.
जुलै महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद?
▪ 3 जुलै – त्रिपुरामध्ये खारची पूजा निमित्त बँका कार्यरत राहणार नाहीत
▪ 5 जुलै – गुरु हरगोबिंद जी यांच्या जयंतीच्या निमित्ताने जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी
▪ 6 जुलै – रविवारी देशभरातील सर्व बँका बंद राहतील
▪ 12 जुलै – दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण देशभर बँकांना सुट्टी
▪ 13 जुलै – रविवार असल्याने देशभर बँक बंद
▪ 14 जुलै – मेघालयमध्ये बेह दिनखलाम या सणामुळे बँकांना विश्रांती
▪ 16 जुलै – उत्तराखंडमध्ये हरेला सण साजरा होणार असल्यामुळे बँकांना सुट्टी
▪ 17 जुलै – मेघालयात यू तिरोट सिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त बँका बंद
▪ 19 जुलै – त्रिपुरामध्ये केर पूजा निमित्त बँक व्यवहार बंद
▪ 20 जुलै – रविवारमुळे देशभरातील बँका राहणार बंद
▪ 26 जुलै – चौथा शनिवार असल्याने सर्व बँका बंद राहतील
▪ 27 जुलै – रविवारी पुन्हा एकदा सर्व बँकांना सुट्टी
▪ 28 जुलै – सिक्कीममध्ये द्रुकपा त्शे-जी यांच्या पुण्यतिथीमुळे बँका बंद राहणार
या सुट्ट्या काही राज्यांपुरत्या मर्यादित असून, बँक व्यवहार करण्यापूर्वी स्थानिक शाखेची वेळ आणि कार्यस्थिती तपासून घ्या.
ऑनलाइन बँकिंगचा पर्याय निवडा
बँका बंद असताना व्यवहार करताना अडचण येऊ नये यासाठी डिजिटल बँकिंगचा लाभ घ्या. रोख रक्कम काढायची असल्यास जवळच्या एटीएमचा वापर करा. पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल अॅप्लिकेशन वापरणे अधिक सोयीचे ठरते. व्यवहारांसाठी यूपीआय सेवा देखील उपयोगी आहे. विशेष म्हणजे, सुट्टीच्या दिवशी यूपीआय सेवा नियमितपणे कार्यरत असते आणि त्यावर कोणताही परिणाम होत नाही.
Discussion about this post