सातारा । लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून अशातच सातारा जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशासह तिघांना लाच घेताना पकडण्यात आल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी थेट लाच मागतिली. सातरा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी जामीन देण्यासाठी फिर्यादीकडून ५ लाख रुपयांची लाच मागितली. विशेष म्हणजे जेथे नागरिकांना न्याय मिळतो त्या पवित्र न्यायालयाच्या अवारातच न्यायाधीशांनी लाच मागितल्याची माहिती समोर आलीय.
न्यायाधीशांनी फिर्यादीकडून न्यायालयाच्या आवारात लाच मागितली होती. लाचचे पैसे मध्यस्थींमार्फत घेण्यात आले होते. एका हॉटेलमध्ये लाचचे पैसे घेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांनी साफळा रचत पैसे घेणाऱ्या मध्यस्थींला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्यस्थी पैसे तेथेच टाकून तेथून पळून गेले. दरम्यान याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्यायव्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. खळबळ उडाली आहे.
Discussion about this post