जळगाव । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांबाबत केलेल्या बेताल वक्तव्यावरून राज्यातील ठीकठिकाणी आंदोलने केली जात आहे. याच दरम्यान, जळगावातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने निषेध केला.
येथील आकाशवाणी चौकात जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येऊन आमदार पडळकर यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.
जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, महिला अध्यक्षा मंगला पाटील, वाल्मीक पाटील, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, महानगर जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, किरण राजपूत, रहिम तडवी, अकिलभाई पटेल, राजा मिर्झा, सबाज तडवी, अकील खान, चेतन पवार, हितेश जावळे, आकाश हिवाळे, खलील शेख, प्रमोद पाटील, विनोद धमाले, मयूर पाटील, गणेश सोनार, नईम खाटीक, राहुल टोके, बशीरभाई शाह, सुहास चौधरी, संजय चव्हाण, आप्पा मराठे, मुश्ताक खाटीक, वाहबभाई खाटीक, मंजूर पटेल, हेमंत खैरनार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
Discussion about this post