१०वी आणि १२ वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. १० वी पास तरुणांकडे सरकारी नोकरी करण्याची चांगली संधी आहे. समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य येथे भरती जाहीर करण्यात आली आहे.समाज कल्याण विभागातील या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.
समाज कल्याण आयुक्तालयात २२९ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. गृहपाल, लघुलेखक, टंकलेखक आणि इतर अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
समाज कल्याण आयुक्तालयात या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पर्मनंट नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.
लघुलेखक पदासाठी उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे. त्याचचसोबत इंग्रजी लखुलेखन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्या व्यक्तीला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.लघुटंकलेखक पदासाठी दहावी पास असावे. त्याचसोबत मराठी टंकलेखनाचा वेग असायला हावे.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी. गृहपाल (महिला) पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
समाज कल्याण आयुक्तालयातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नो्व्हेंबर २०२४आहे.