जळगाव : जिल्हा वकील संघाची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे यांनी १०१ मतांच्या आघाडीने दणदणीत विजय मिळवला. सचिवपदी ॲड. विरेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे, तर सहसचिवपदी ॲड. लिना म्हस्के यांची निवड झाली. निकाल जाहीर होताच उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी पेढे वाटून मोठ्या जल्लोषात विजयाचा आनंद साजरा केला.
वकील संघाच्या १५ जागांसाठीच्या निवडणुकीत एकूण ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन अर्ज छाननीदरम्यान बाद झाले होते, तर दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १३ जागांसाठी ३३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.
मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत १,१०० मतदारांपैकी ८८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी चार वाजता मतदान आटोपल्यानंतर लगेच मतमोजणीला सुरूवात झाली. रात्री उशिरा सव्वाअकराच्या सुमारास शेवटचा निकाल जाहीर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. आर.एन. पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. मंगला पाटील, ॲड. ए.आर. सरोदे यांनी काम पाहिले.















Discussion about this post