नवी दिल्ली । देशाची राजधानी दिल्लीतील एका ज्वेलरी शोरूममध्ये करोडोंची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. शोरूमची भिंत फोडून चोरट्यांनी ही घटना घडवली. दुकानात ठेवलेले 20 ते 25 कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेल्याचे शोरूम मालकांचे म्हणणे आहे.
पश्चिम दिल्लीतील जंगपुरा येथे ही घटना घडली. उमराव सिंग आणि महावीर प्रसाद जैन यांच्या शोरूमची भिंत मध्यरात्री चोरट्यांनी फोडली. शोरूम मालकाच्या म्हणण्यानुसार दुकानात 20 ते 25 कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते.
खरंतर साप्ताहिक सुट्टीमुळे सोमवारी जंगपुरा बाजार बंद असतो. त्यामुळे रविवारी शोरूम बंद केल्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजता मालकाने शोरूम गाठून तेथील दृश्य पाहिले असता त्यांना धक्काच बसला. शोरूममध्ये ठेवलेले संपूर्ण दागिने काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले. शोरूम रिकामे पाहून त्यांना धक्काच बसला. शोरूम मालकाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा बारकाईने तपास केला.
Discussion about this post