भुसावळ । अवैध गौण खनिज वाहतुकीवर तहसीलदारांनी कारवाई करत कडगाव शिवारात (भुसावळच्या बाजूने) वाघूर नदीजवळ अवैध मुरूम उत्खनन करत असतांना छापा टाकला. पोलिस, महसूलची गाडी पहात वाहने सोडून पळ काढणाऱ्या अवैध गौण खनिज तस्करांना पाठलाग करून पकडले.
तहसीलदार नीता लबडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कडगाव शिवारातील नदीजवळ सुरू असलेल्या मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्याने अचानक धाड टाकली.या कारवाईत ६ डंपर आणि एक जेसीबी ताब्यात घेण्यात आले. हे डंपर आणि जेसीबी मुरूमाचे उत्खनन करत असताना रंगेहाथ पकडले. नशिराबाद पोलिसांच्या बंदोबस्तात हे सर्व जप्त केलेले साहित्य भुसावळ तहसील कार्यालयात संध्याकाळी जमा करण्यात आले आहे.
पथकाने केली कारवाई
तहसीलदार निता लबडे यांच्यासह महिला मंडळाधिकारी रजनी तायडे, प्रफुल्ल कांबळे, प्रवीण पाटील, तलाठी नितीन तेली, गोपाळ भगत, मंगेश पारिसे, रोषन कापसे, तेसज पाटील, जितेश चौधरी, संदीप पाटील आदींनी कारवाई केली.
Discussion about this post