जळगाव : राज्यातील काही ठिकाणी गिलियन बरे सिंड्रोम (जीबीएस) थैमान घातले असून आता या नव्या आजाराने जळगावात एन्ट्री केली आहे. शहरातील ४५ वर्षीय महिलेला या आजाराची लागण झाली असून तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयसीयू कक्षात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. जळगावच्या शासकीय रुग्णालयाची ही पहिली महिला रुग्ण आहे.
चार दिवसापूर्वी या पन्नास वर्षे महिलेचे पायांत विकनेस जाणवत होता. त्यानंतर तिला उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या ठिकाणी एमआरआय व सी एस एफ तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर जीबीएस झाल्याचे निष्पण झाले. झालेले आहेत सध्या रुग्णाची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकुर यांनी दिली आहे.
यापूर्वी डिसेंबर महिन्यामध्ये असा रुग्ण आढळल्याचे त्याची सांगितले. तसेच योग्य वेळी या रुग्णांवर उपचार झाल्यास रुग्ण सुरक्षित घरी परत असते ते म्हणाले गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) यासाठी डॉक्टर, नर्सिंग, आशा वर्कर यांना प्रशिक्षण देण्यात आले. जीबीएस आज संसर्गजन्य रोग नाही हा कच्चे अन्न व मांसाहारातून होतो. यामध्ये सर्वप्रथम लक्षणे म्हणजे पायामध्ये थकवा जाणवतो.
Discussion about this post