मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नियुक्ती निश्चित मानली जात आहे.
15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहेत. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदाचा वाद चिघळला होता. त्यातही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष बदलासाठी जोर धरला. यात रोहित पवार या पदासाठी आग्रही असल्याचं दिसून आलं होतं.
मुंबईत पदाधिकारी बैठकीत “बास आता, जयंत पाटील यांना थांबवा. त्यांच्या जागी रोहित पवार किंवा रोहित पाटील यांना संधी द्यावी” अशी मागणी शरद पवार यांच्यासमोरच झाली होती.यामुळे जयंत पाटलांनी या पदापासून बाजूला होण्यासाठी दबाव निर्माण करण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले, मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. आज सात वर्षाचा कालावधीमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक असल्याचं जयंत पाटील म्हणाले. असं म्हणतात बालगंधर्व रंगमंदिर येथे एकच गोंधळ झाला अनेक कार्यकर्त्यांनी उठून त्याला विरोध दर्शवला होता.
Discussion about this post