राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली आहे. ‘मंगळसूत्र चोरी’ या विषयावर पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन आमदार पाटील यांना लक्ष्य केले. जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र चोरलं, ते त्यांनी सांगावं असं पडळकर म्हणालेयत.
जयंत पाटलांवर टीका करताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, माझ्या डोक्यात जायची वाट बघू नका. डोक्यात जाण्याचा प्रयत्न कराल ती तुमच्यासाठी काळीकूट अंधाराची रात्र असेल. महाराष्ट्र संस्कृती सभा झाली,आणि मला आय बहिणीवर शिव्या देत होते. मला गोप्या-गोप्या म्हणत होते, मी तुला जंत्या म्हटलं तर चालेल का..? अरे त्या जयंत्याला चॅलेंज आहे,
तुम्ही जातीवंत पाटील असाल तर पत्रकार परिषद घेऊन ठिकाण-वेळ जाहीर करा, मी त्या ठिकाणी येतो,असे खुले आव्हान देखील पडळकरांनी दिले आहे. तसेच मला गोप्या म्हणलं जातंय, मग मी जयंत पाटलांना जंत्या म्हणू का ? अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.















Discussion about this post