जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर आता शरद पवार राज्यात सर्वत्र दौरे करून पक्ष संघटना मजबूत करत आहेत. त्यातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना लोकसभेचे शिवधनुष्य पेलण्याचे आवाहन केले आहे.
गत 25 ते 30 वर्षांपासून जळगाव जिल्ह्याने भाजपच्या 2 खासदारांना लोकसभेवर पाठवले आहे. या ठिकाणी एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले पाहिजे. खडसेंनी जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच जागा जिंकण्याचे प्रयत्न करावेत. त्यात त्यांना निश्चितच यश येईल, असे जयंत पाटील राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत बोलताना म्हणाले.
जयंत पाटील यांच्या या विधानामुळे एकनाथ खडसे यांना रावेर मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी 1995 मध्ये जळगाव जिल्ह्यानेत ब्बल 7 आमदार निवडून देऊन 100 टक्के निकाल दिला होता. ही या जिल्ह्याची परंपरा आहे, अशी आठवणही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितली.
जयंत पाटलांनी यावेळी जालन्यात झालेल्या लाठीचार्जवरूनही सरकारवर निशाणा साधला. सरकार मराठा आंदोलकांवर लाठीहल्ल्याचे आदेश दिले नसल्याचा दावा करत आहे. मग या मंत्र्यांना विश्वासात न घेता पोलिस लाठीमार करत असतील, तर हे लोक सरकारमध्ये काय करत आहेत, असे ते म्हणाले. 3
Discussion about this post