जळगाव | भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्याचे औचित्य साधुन महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे व राज्यभर रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी “जय भीम पदयात्रा” कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगाव शहरात भव्य “जय भीम पदयात्रे” चे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रा सकाळी 07. वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथेून सुरु होईल. या पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल – कोर्ट चौक – पंडीत जवाहरलाल नेहरु स्मारक – डॉ. बाबासाहेब अंबेडकर स्मारक असा राहील.
या पदयात्रेच्या कार्यक्रमामध्ये जळगांव शहरातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थाचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी आपल्या शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थामधील खेळाडु, एन.सी.सी. व एन.एस.एस चे विद्यार्थी आवर्जुन तसेच इतर नियमीत विद्यार्थी मोठ्या संखेने सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला पालक मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, केंद्रिय मंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परषिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जिल्हा नेहरु युवा केंद्राचे नरेंद्र डागर, तसेच जिल्ह्यातील शिव छत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय स्वयंसेवक, एन.सी.सी. कॅडेट्स, नागरीक हे उपस्थित राहणार आहेत.
Discussion about this post