बीड । मनोज जरांगे पाटलांची सभा बीडमध्ये होत आहे. या सभेसाठी मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमलाय.दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळांवर तुफान हल्ला केला. त्याच बरोबर त्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिलाय
सभेतील गर्दी पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील, अशी टीका केली. तसेच छगन भुजबळ यांचं ऐकून आरक्षण नाकारू नका, अन्यथा सरकारला जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.एकदा आरक्षण मिळालं की नंतर काय ते दाखवतो असं सांगितलं आहे.
मराठा आरक्षण आता कसं आणायचं ते बघाच, मराठा आरक्षण मिळवणारच, असंही मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाज आतापर्यंत शांत आहे, पण सरकारने झोपू नये असंही ते म्हणाले. ते येवल्याचं येडपट माझी शाळा काढतंय, याला मंत्री कुणी केला? असा सवाल करत जरांगे यांनी भुजबळांवर तुफान हल्ला केला.
राज्य सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले की, “सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेणार असाल, आरक्षणामध्ये आडकाठी करणार असाल तर शहाणे व्हा. मराठा समाजाला ताटकळत ठेऊ नका. नाहीतर शांततेत तुमचा सुफडा साफ केला जाईल. तुमचं राजकीय अस्तित्व संपवलं जाईल. तुम्ही ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर पुढचं आंदोलन तुम्हाला 100 टक्के जड जाणार.”
Discussion about this post