संभाजीनगर ! मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. याचदरम्यान रुग्णालयात दाखल असलेले मनोज जरांगे यांची मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षण आणि इतर विषयावर चर्चा केली. यावेळी जरांगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ”अंतरवाली सराटीबद्दल आम्ही बोललो होतो, ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली, ते 132 हून अधिक आहेत. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले. मग आम्ही सांगत आहोत त्यांच्यावरही तुम्ही गुन्हे दाखल करायला हवे. त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळी तुम्ही (राज्य सरकार) म्हणालात द्या विषय सोडून तो आता.”
ते म्हणाले, ”अंतरवाली सराटीच्या घटनेतील मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे सरसकट मागे घेऊ. आता तीन महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत. आम्ही काय चूक केली, तुमचा शब्द आम्ही मोडला नाही, मात्र आमचा एक-एक माणसाला तुम्ही अटक करत आहेत. कितीतरी लोकांना नोटीसही गेली आहे. असं असताना कशी चर्चा कार्याची तुमच्याशी?”
Discussion about this post