जामनेर । चालत्या ट्रॅक्टरमधून अचानक धूर निघाल्याने ट्रॅक्टर चालकाचा नियंत्रण सुटलल्याने ट्रॅक्टर थेट पुलाच्या खाली पलटी झाले. यानंतर ट्रॅक्टरने पेट घेऊन ५ क्विंटल कापूससह ट्रॅक्टर पुर्णपणे जळून खाक झाले आहे.तर या घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले. ही घटना जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील किशोर दलसिंग परदेशी यांच्या शेतात कापूस वेचून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीयू १६९४) यामध्ये ५ क्विंटल कापूस घेऊन किशोर परदेशी (वय-३७), स्वाती परदेशी वय-३२, योगिता परदेशी वय-१८, पूजा परदेशी वय-१६, आरती परदेशी वय-१६, हिराबाई परदेशी वय-३५ व वैशाली धनगर वय-२५ हे घराकडे येत असताना जळगाव छत्रपती संभाजी नगर हायवे रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपजवळ ट्रॅक्टर मधून अचानक धूर निघाल्याने ट्रॅक्टर पुलाच्या खाली पलटी झाली. यावेळी यातील सर्व ७ जण हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर ट्रॅक्टर व ५ क्विंटल कापूस पुर्णपणे जळून खाक झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तर गावात घटनेची माहिती मिळताच गावातील गणेश माळी, रवींद्र परदेशी, सागर परदेशी, पवण परदेशी, आकाश परदेशी, ग्रामपंचायत सदस्य देवचंद परदेशी, दिपक परदेशी, पन्नालाल परदेशी, शालिक परदेशी, कैलास परदेशी व मित्र परिवार यांनी ट्रॅक्टरची आग विझविण्यात मदत करत जखमींना रुग्णालयात हलविण्यात सहकार्य केले.