जामनेर । जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणार घटना समोर आलीय. जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावात राहणाऱ्या एका ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंब वास्तव्यास असून पेरणीच्या दिवसांमुळे कुटूंब शेतात गेल्यानंतर या कुटूंबातील अवघ्या सहा वर्षाची बालिका घरी असल्याने पंचवीस वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीला एका केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिचा गळा आवळून खून केला.
पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील सायंकाळी कामावरुन घरी आल्यावर त्यांनी मुलीला घरात पाहिले घरात मुलगी दिसली नाही म्हणून त्यांनी आसपासच्या शेजार्यांना विचारपूस केली. मात्र मुलगी सापडली नाही तेव्हा त्यांनी गावकर्यांना ही घटना सांगितली. गावकर्यांनी मुलीचा सर्वदूर शोध घेतला असता ती मुलगी एका केळीच्या मळ्यात मृतावस्थेत आढळली.
मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा
गावकर्यांनी तातडीने जामनेर पोलीस स्टेशनला घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्याच्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृत मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, दोषी तरुणाला अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा पीडीतेच्या कुटूंबातील नातेवाईकांनी घेतला आहे. मयताच्या पश्चात भाऊ, दोन बहिणी व आई-वडील असा परिवार आहे.















Discussion about this post