जामनेर । जामनेर तालुक्यात महिलेवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतमजूर विधवा महिला ही सरपण गोळा करीत असताना एकाने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जामनेर तालुक्यातील एका गावातील संशयित आरोपी विष्णू पूनमचंद राठोड याने 7 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास 40 वर्षीय पीडित महिला ही सरपन गोळा करीत असताना तिला पकडून महिलेच्या जेठाच्या शेतात नाल्याजवळ घेऊन जात तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला .
याप्रकरणी पीडित महिलेने पहुर पोलीस स्टेशनला धाव घेऊन आरोपी विष्णू राठोड याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.
Discussion about this post