जामनेर । राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैसे, दागिने आणि मोठ्या प्रमाणावर रक्कम पकडली जात आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. अशातच जामनेर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करून आपल्या उमेदवाराच्या विरोधात वापरला जाऊ शकतो, असं म्हणत गोडाऊन भरून पैसा ठेवलेला आहे आणि हा पैसा आपल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणुकीमध्ये वापरला जाऊ शकतो असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला.
यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केलीय. गिरीश महाजन आमदार झाले, मंत्री झाले. मात्र, मंत्री झाल्यानंतर त्यांनी तुमच्यासाठी काय केलं. मोठी-मोठी खाती त्यांच्याकडे होती. जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं. मतदारसंघ शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम झाला असता. काय विकास केला गिरीश महाजनांनी, असं ते म्हणाले















Discussion about this post