जामनेर, |
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या निर्घृण व अमानवी घटनेने संपूर्ण देश हदरला आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आज जामनेर शहरातील व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी कडकडीत बंद पाळत आपला रोष आणि शोक व्यक्त केला.
सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार ठप्प होते. मुख्य बाजारपेठ, छोटीमोठी दुकाने, हॉटेल्स, फेरीवाले, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक सर्वांनी एकजुटीने आपले व्यवहार बंद ठेवले. या बंदला जामनेरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू न देता संपूर्ण बंद शांततेत पार पडला.
स्थानिक व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, आणि तरुण कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरत “काश्मीरमधील अमानवी कृत्याचा निषेध असो!”, “शांततेतून विरोध व्यक्त करू या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या बंदमुळे एक बाब स्पष्ट झाली – जामनेरकर हे कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला कायम तयार आहेत. काश्मीरमधील पीडितांना मानवतेच्या आधाराने न्याय मिळावा, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
Discussion about this post