जालना । जालन्यामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात सूनेने सासूची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह गोणीमध्ये भरूर सून फरार झाली आहे. सविता शिनगारे (४५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.
जालन्यामध्ये सूनेने सासूची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूनेने आधी सासूची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह गोणीमध्ये भरूर ती तिथून पळून गेली. जालना शहरातील भोकरदन नाका येथील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील भोकरदन नाका येथील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी सविता शिनगारे सून प्रतीक्षा शिनगारेसोबत राहत होत्या. त्या मूळच्या बीडच्या असून त्या जालन्यामध्ये भाड्याने घर घेऊन राहत होत्या. सविता यांचा मुलगा लातूरमध्ये नोकरी करतो आणि तो त्याच ठिकाणी राहतो. त्यामुळे सविता सूनेसोबत जालन्यात राहत होत्या.
सविता आणि प्रतीक्षा यांच्यामध्ये कौटुंबिक कारणांवरून सतत वाद व्हायचा. याचाच राग मनात धरून प्रतीक्षाने पहाटे सासूची हत्या केली. प्रतीक्षा सासूच्या खोलीत गेली. सासूचे डोकं पकडून भिंतीवर आपटून आपटून तिची हत्या केली. प्रतीक्षाने सासूच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो गोणीमध्ये भरला आणि घराबाहेर आणला. मृतदेह जड असल्यामुळे तिला तो घेऊन जाता येत नव्हता. तेवढयात घरमालकाने प्रतीक्षाला पाहिले. तिच्या हालचाली पाहून घरमालकाला संशय आला त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.
घरमालकाला पाहिल्यानंतर घाबरलेली प्रतीक्षा सासूचा मृतदेह तिकडेच टाकून फरार झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून ते तपास करत आहेत. आरोपी प्रतीक्षा शिनगारेच्या शोधासाठी सदर बाजार पोलिसांची दोन पथक रवाना केली होती. अखेर प्रतीक्षाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. परभणीतून तिला ताब्यात घेण्यात आलं.
Discussion about this post