मुंबई | आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत जळगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी तब्बल ३५५२ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या रेल्वे मार्गामुळे खान्देश आणि मराठवाड्याची वेगवान कनेक्टीव्हिटी होणार आहे.
जळगाव ते जालना या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले होते. तर याला आज मोठ्या रकमेच्या निधीची मान्यता मिळाल्याने या रेल्वे मार्गाच्या कामाचा रस्ता मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
असा आहे रेल्वेमार्ग
जालना ते जळगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग १७४ किलोमीटर लांबीचा आहे. यात जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, पहूर आणि जळगाव अशी स्थानके राहणार आहेत. यात याच मार्गावरील अजून काही स्थानकांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या रेल्वे मार्गामुळे खान्देश आणि मराठवाड्याची वेगवान कनेक्टीव्हिटी होणार आहे.
Discussion about this post