जळगाव । जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग कर्मचारी तपासणीत तफावत आढळल्याने आणखी ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केलेल्या कारवाईने खळबळ उडाली असून या कारवाईमुळे आतापर्यंत एकूण १३ कर्मचारी निलंबित झाले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पाचही कर्मचाऱ्याविरुद्ध बुधवार दि २१ जानेवारी रोजी कारवाई केली आहे. राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची uid कार्ड तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आलेल्या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.
हे पाच कर्मचारी निलंबित
त्यानुसार भास्कर रामदास चिमणकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यावल,विनोद शांताराम बोधरे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती चोपडा, शांताराम उखरडू तायडे, वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती यावल,दिनेश लक्ष्मण नन्नवरे कनिष्ठ सहाय्यक ग्रामपंचायत विभाग,पारसमणी काशीराम मोर,कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती अमळनेर या पाच कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई बुधवार दि २१ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.















Discussion about this post