Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात लेवा गणबोली कवी संमेलनात दमदार कवितांचे सादरीकरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 3, 2024
in जळगाव जिल्हा
0
बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात लेवा गणबोली कवी संमेलनात दमदार कवितांचे सादरीकरण
बातमी शेअर करा..!

जळगाव । विश्व लेवा गणबोली दिन आणि बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ग्रंथालया नजीक हिरवळीवर आयोजित लेवा गणबोली कवी संमेलनात शेतकरी, तरुण पिढी, संवेदनशील स्त्री जीवन आदी विषयांवरील लेवा भाषेतील दमदार कवितांच्या सादरीकरणाने बहिणाबाईंचा वारसा नव्या- जुन्या पिढीच्या समन्वयातून अधिक समृद्ध होत राहील असा आशावाद व्यक्त झाला.

मंगळवार दिनांक ३ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत असलेल्या बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने बहिणाबाई चौधरी स्मृतिदिनानिमित्त लेवा गणबोली कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.

ग्रंथालयाच्या इमारतीत असलेल्या या प्रशाळेबाहेरील हिरवळीवर हे कवी संमेलन पार पडले. उबदार थंडीत सकाळी बहिणाबाईंचा वारसा समृद्धपणे चालवण्याची ग्वाही देणारे कवी – कवयित्री जमले होते.प्रा. व.पू. होले, प्रा. संध्या महाजन, अरविंद नारखेडे,तुषार वाघुळदे, शीतल पाटील यांनी खूप ताकदीच्या कविता सादर केल्या.

प्रा.संध्या महाजन यांनी सुख आणि दुःख तसेच धरित्रीचा धनी शेतकरी या विषयावर कविता सादर केल्या, तर अरविंद नारखेडे यांनी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची आणि खानदेशाचा समृद्ध वारसा सांगणाऱ्या कविता सादर केल्या.तुषार वाघुळदे यांनी तरुण पिढीशी संवाद साधणारे त्याबरोबरच स्वप्न पाहणाऱ्या नेमक्या आशयाच्या कविता सादर केल्या.मासिक पाळी या विषयावर आणि संसारातील स्त्री यावर शीतल पाटील यांच्या कवितांना उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रा.व.पु.होले यांनी कोरोना काळातील अनुभवावर कविता सादर केली.

प्रा. होले यांचे व्याख्यानही झाले. त्यांनी बोलीभाषेचे सौंदर्य आपल्या भाषणातून विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. व्यक्तिमत्व विकासासाठी बुद्धिमत्ता आणि भावनांक बरोबरीने असण्याची गरज असून तो केवळ बोलीभाषेतून अधिक समृद्ध होतो; मात्र दुर्दैवाने बोलीभाषा ही गावठी ठरवून टाळली जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.बोलीभाषेतून संवेदना समोरच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचतात. त्यामुळे बोलीभाषेचे महत्त्व कमी होणे शक्य नाही,असे सांगत प्रा.होले यांनी बहिणाबाई चौधरी या मानवतावादी तत्त्वज्ञ होत्या असे मत व्यक्त केले.

विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म.सु पगारे यांनी बोलीभाषा व बहिणाबाईंच्या कविता यावर भाष्य केले. या केंद्रातर्फे संशोधनात्मक लेखनासाठी अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातर्फे बहिणाबाईंवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे संशोधन शिष्यवृत्ती दिली जात आहे.भविष्यात साहित्य संमेलन विविध स्पर्धा या केंद्राकडून घेणार असल्याचेही प्रा. पगारे यांनी सांगितले.केंद्राचे विभागप्रमुख डॉ. नितीन बडगुजर यांनी प्रास्ताविक केले. स्नेहा गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व गौरव हरताळे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रुसू बाई रुसू.. रोहिणी खडसेंनी कवितेतून एकनाथ शिंदेंसह महायुतीला नेत्यांना टोला हाणला

Next Post

धक्कादायक ! जळगाव मनपाची जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे खोदून चोरीस, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

धक्कादायक ! जळगाव मनपाची जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे खोदून चोरीस, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026
त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

March 14, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

भारतीयांना महागाईचा दुहेरी धक्का; गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार?

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page