Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यापीठात सरकारचे क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 30, 2025
in जळगाव जिल्हा
0
विद्यापीठात सरकारचे क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
बातमी शेअर करा..!

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जिमखाना डे कार्यक्रम उत्साहात

जळगाव । खान्देशातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारची असल्याने हे खेळाडू देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे या करीता सरकारचे क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञानाचे केंद्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ग्वाही विद्यापीठात वतीने दि. ३० जून रोजी आयोजित जिमखाना डे या कार्यक्रमात केंद्रीय राज्य व युवक कल्याण क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ. अमोल पाटील, डॉ. पवित्रा पाटील, प्रा. म.सु. पगारे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, अधिसभा सदस्य डॉ. एस.टी. पाटील, डॉ. आय.डी. पाटील, स्वप्नाली काळे (महाजन), क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना मंत्री खडसे म्हणाल्या की, खान्देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करून, नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून देश पातळीवरील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांमध्ये सहभाग घ्यावा तशी तयारी करावी. चौकटी बाहेर जावून खेळाबद्दल विचार करावा. विद्यापीठात क्रीडा विज्ञान तंत्रज्ञानाचे केंद्र उभारणीचे आश्वासन देत विविध क्रीडा कोर्सेस विद्यापीठात सुरु करता येईल असे सांगून खेळाडूंनी भारत सरकारच्या क्रीडा प्राधिकरणांकडे (SAI) प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. क्रीडा क्षेत्रात करीअर घडविण्याची मोठी संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून घरघरात खेळ पोहचविण्यासाठी योजना तयार केली आहे. या योजनेचा लाभ विस्तारीत व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी केली. खेळांमधून सांघिक भावना वाढीस लागून मैत्रीपूर्ण वातावरण तयार होते असेही त्या म्हणाल्या.

व्यवस्थापन परिषद सदस्य व जिमखाना समितीचे अध्यक्ष ॲङ. अमोल पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थी खेळाडूंचा खेळतांना अपघात झाल्यास त्याकरीता मदतीची व्यवस्था होण्याकरीता विद्यापीठ खेळाडू अपघात विमा योजना सुरु करण्याची आखणी करीत आहे. स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरु केली आहे की ज्यायोगे खेळाडूं विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल.

अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, विद्यापीठाने दोन कोटी रूपयांची तरतूद क्रीडा विभागासाठी केली आहे. खेळाडूंनी केवळविद्यापीठ स्पर्धांपूरता मर्यादित न राहता देश पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पोहचता येईल यासाठी

प्रयत्न करावे त्या करीता शारिरीक व मानसिक तंदुरूस्ती, सातत्य, सराव व क्षमता विकसित करणे त्याकरीता क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान अवलंब केला पाहिजे असे आवाहन करीत जे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये सहभागी होतील त्यांना विद्यापिठा कडून मदत केली जाईल असे आश्वस्त केले.

या कार्यक्रमात २०२३-२४ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सोनगीर महाविद्यालयातील प्रथमेश देवरे यास व २०२४-२५ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जी.टी.पी. महाविद्यालय नंदुरबार येथील रिंकी पावरा यांच्या जैन इरिगेशन पुरस्कृत खाशाबा जाधव सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. आजच्या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूं तसेच दक्षिण पश्चिम विभागीय, अखिल भारतीय, आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धा व क्रीडा महोत्सव स्पर्धा तसेच भारतीय विद्यापीठ संघात निवड झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, रौप्य पदक, कांस्य पदक प्राप्त खेळाडूंचा आणि नुकत्याच जाहीर झालेल्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशा एकूण २२० खेळाडू व महाविद्यालयातील ४६ क्रीडा संचालक यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यापीठातर्फे खेळाडू विद्यार्थ्यांसाठी केलेल्या भरीव मदतीची माहिती दिली. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हिंदी सक्तीचे GR रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंची मोठी घोषणा; 5 जुलैला…

Next Post

सोन्याच्या दागिन्यांसाठी पारोळ्यातील महिलेची हत्या ; संशयित आरोपीच्या धुळे जिल्ह्यातून आवळल्या मुसक्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

सोन्याच्या दागिन्यांसाठी पारोळ्यातील महिलेची हत्या ; संशयित आरोपीच्या धुळे जिल्ह्यातून आवळल्या मुसक्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page