जळगाव । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. यात जळगाव जिल्ह्यात ६५.७७% इतके मतदान झाले आहे.
जिल्ह्यात चोपडा मतदारसंघात पुरुष १ लाख १० हजार ३७३ महिला १ लाख १० हजार २६१, रावेर मतदारसंघात १ लाख १८ हजार १०१ पुरुष तर महिला १ लाख १० हजार ४७० आणि २ तृतीयपंथीयांनी मतदान केले. भुसावळ मतदारसंघात ९४ हजार ८४६ पुरुषांनी तर ८७ हजार ८२५ महिलांनी तसेच १२ तृतीयपंथीयांनी मतदान केले. जळगाव शहरात १ लाख २३ हजार ८७९ पुरुषांनी व १ लाख १४ हजार ३१६ महिलांनी तसेच ४ तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. जळगाव ग्रामीण मतदार संघात १ लाख २१ हजार ४९२ पुरुष, १ लाख १२ हजार ४०४ महिलांनी तर ३ तृतीयपंथीय समाजाने मतदान केले.
अमळनेर मतदारसंघात १ लाख ४ हजार ६६ पुरुषांनी तर ९८ हजार १८० महिलांनी मतदान केले. एरंडोल मतदारसंघात १ लाख ४ हजार ७६ पुरुष तर ९८ हजार ७७० महिलांनी यासह ५ तृतीयपंथी यांनी मतदान केले. चाळीसगाव मतदारसंघात १ लाख २० हजार ७३६ पुरुष तर १ लाख १० हजार ५२४ महिला आणि ९ तृतीयपंथीयांनी मतदानाचा अधिकार बजावला. पाचोरा विधानसभा मतदारसंघात १ लाख १७ हजार ६९३ पुरुष तर १ लाख १० हजार ४०६ महिलांनी आणि ६ तृतीयपंथीय समाजाने मतदान केले.
जामनेर येथे १ लाख २२ हजार ४५३ पुरुष व १ लाख १४ हजार ८१ महिलांनी तर मुक्ताईनगर मतदारसंघात १ लाख ११ हजार ११३ पुरुष तर १ लाख ३ हजार ८९६ महिला आणि २ तृतीयपंथीयांनी मतदानाचा अधिकार बजावला. जिल्ह्यातील १४४ तृतीयपंथीयांपैकी ४४ तृतीयपंथी यांनी मतदान केले.
जिल्ह्यातील मतदानाची एकूण टक्केवारी मध्ये चोपडा ६६.५८, रावेर ७३.८४, भुसावळ ५७.७५, जळगाव शहर ५४.९५ जळगाव ग्रामीण ६९.३३, अमळनेर ६५.६१, एरंडोल ६८.७६, चाळीसगाव ६१.६७, पाचोरा ६८.३२, जामनेर ७०.५५, मुक्ताईनगर ७०.७१ अशी असून एकूण टक्केवारी मागील १० वर्षांच्या विधानसभा निकाल पेक्षा अधिक ६५.७७ इतकी आहे.
Discussion about this post