जळगाव । वाढत्या उन्हाळी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातून उत्तर भारतातील महत्त्वाच्या शहरांकडे विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे ते गाझीपूर सिटी दरम्यान द्विसाप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१४३१ पुणे–गाझीपूर विशेष गाडी १७ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत दर मंगळवार आणि शुक्रवारी पुणे येथून सकाळी ६.४० वाजता सुटेल. ही गाडी दुपारी ३.२३ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचून थांबा घेईल आणि त्यानंतर गाझीपूरकडे रवाना होईल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४३२ गाझीपूर सिटी–पुणे विशेष गाडी १९ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान दर रविवारी आणि गुरुवारी गाझीपूर येथून पहाटे ४.२० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता जळगाव स्थानकावर पोहोचेल आणि पुढे पुण्याकडे मार्गस्थ होईल.
या विशेष गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होणार असून जळगाव जिल्ह्यातील उत्तर भारतीय बांधव तसेच उन्हाळी सुटीत प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. ही ट्रेन मार्गावरील दौंड, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खांडवा, पिंपरीया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी जं, सतना, माणिकपूर, प्रयागराजमी वाराणसी, जौनपूर, अनरीहार जं, स्थानकांवर थांबेल.















Discussion about this post