जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (पेट) दि. २७ जुलै पासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात पेट परीक्षा होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या संशोधन विभागाच्या वतीने संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १०ऑगस्ट,२०२३ पर्यंत विद्यार्थ्यांना पेट परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन भरता येतील. १७ ऑगस्टला भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी जमा करावयाची मुदत आहे. २० ऑगस्ट रोजी पात्र असलेल्या आणि प्रवेश परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक यादी प्रसिध्द होईल.
या यादीवर आक्षेप घेण्याची मुदत २२ ऑगस्ट आहे. २५ ऑगस्टला अंतीम यादी प्रसिध्द होईल. २७ ऑगस्टला विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये वेळापत्रकासह हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जातील. सद्या १३, १४, १५ व १६ सप्टेंबर या परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती उपकुलसचिव व्ही.व्ही. तळेले यांनी दिली.
Discussion about this post