जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथे केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षांतर्गत युनिव्हर्सिटी इन्स्टिटयूट ऑफ केमिकल येथील विद्यार्थ्यांसाठी आयसीए पिडिलाईट प्रा.लि.मुंबई या नामांकीत कंपनीतर्फे बी.टेक (पेंट टेक्नॉलॉजी) च्या विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी १६ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांची झाली निवड?
विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या असुन त्यात चेतन पाटील,कुणाल भुजबळ, नम्रता आगळे, रनिता अरगडे यांची निवड करण्यात आली आहे.
यासाठी केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे उपसमन्वयक डॉ.उज्ज्वल पाटील, समन्वयक प्रा.रमेश सरदार, प्लेसमेंट ऑफीसर सोनाली दायमा, पेन्ट टेक्नॉलॉजीचे विभागप्रमुख डॉ.रवींद्र पुरी, यांनी व्यवस्थापन केले. या विद्यार्थ्यांचे कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुर प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, युआयसीटीचे संचालक प्रा.जे.बी.नाईक यांनी अभिनंदन केले.
Discussion about this post