जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा माहितीपट (डॉक्युमेंटरी) शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता डी.डी. नॅशनल टेलिव्हिजन चॅनलवर प्रसारीत होणार आहे.
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्तपणे भारतातील शिक्षणविषयक पोर्टल सुरु केले आहे. भारताचा प्रचार जागतिक अभ्यासाचे केंद्र म्हणून व्हावा आणि भारतीय उच्च शिक्षण संस्थांबाबत जागरुकता वाढावी यासाठी ॲकॅडमी फॅार लायझन इन इंटरनॅशनल एज्युकेशन मॅनेजमेंट तर्फे डी.डी. नॅशनल टेलिव्हिजनवर ॲव्हॅन्यूज ऑफ एक्सलन्स या मालिकेअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा माहितीपट शनिवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.
या माहितीपटात विद्यापीठात उपलब्ध अभ्यासक्रम, सुविधा, इतर उपक्रम यांची माहिती दिली जाणार आहे. खान्देशातील व खान्देशाबाहेरील शिक्षणक्षेत्रातील घटक, विद्यार्थी, पालक यांनी हा माहितीपट आवर्जून पाहावा असे आवाहन कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी केले आहे. हा माहितीपट विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील पाहता येणार आहे.
Discussion about this post