कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाने खान्देशातील १० महाविद्यालयांना जोरदार दणका दिला आहे. त्यामागील कारण म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) मूल्यांकन करून घेण्याबाबत सांगूनही त्याकडे डोळेझाक केल्यामुळे या महाविद्यालयांची संलग्नता रद्द का करू नये? अशी विचारणा करणारी नोटीस १० महाविद्यालयांना विद्यापीठाने पाठविली आहे. या १० महाविद्यालयांची नावे मात्र स्पष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही दहा महाविद्यालये नेमकी कोणती आहेत याची उच्छुकता लागलेली आहे.
नॅक मूल्यांकन हे विद्यापीठ, महाविद्यालय यांचा दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता यासाठी ओळखले जाते. त्यानुसार रैंकिंग निश्चित होत असते. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्न १९६ महाविद्यालये आहेत. त्यांना नॅक मूल्यांकन करून घेण्यास सांगण्यात आले होते. परंतु, त्यांच्यातही १० महाविद्यालये अशी होती की, त्यांनी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले. विद्यापीठाने पाठपुरावा केला, त्याचीही त्यांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे अशा दहा महाविद्यालयांना विद्यापीठाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एका महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन करून घेतले नाही म्हणून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मनाई आदेश दिला होता तरीही या महाविद्यालयाने प्रथम वर्ष, विज्ञान शाखेत २३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. याची गंभीर दखल घेत त्यांना २५ हजार रुपये दंड करण्यासह या प्रकाराची पुनरावृत्ती होणार, असे हमीपत्र त्यांच्याकडून घेण्याची कारवाई विद्यापीठाने केली होती. त्यानुसार, संबंधित संस्थेने फेब्रुवारी २०२५ मध्ये दंड व हमीपत्र दिले आहे.
Discussion about this post