Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव विद्यापीठाच्या वसतिगृहात बी. टेकचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
जळगाव विद्यापीठाच्या वसतिगृहात बी. टेकचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
बातमी शेअर करा..!

जळगाव । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात बी. टेकचं शिक्षण घेणाऱ्या अमरावती येथील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

प्रतीक विजयराव गोरडे (वय १९, रा. शिरसगाव कसबा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांचे वसतिगृह क्रमांक तीन येथे खोली क्रमांक टी ४४७ येथे प्रतीक गोरडे हा दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. तसेच विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता.त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी होते. प्रतीक गोरडे याचे वडील शिरसगाव कसबा येथे मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, बुधवारी (ता.११) मुलांनी वसतिगृहात बसलेल्या गणपती मंडळातील आरती केली. त्यानंतर मुले जेवण्यासाठी निघून गेली.

काही वेळानंतर मुले जेवणावरून परतले. त्यावेळेला प्रतीक गोरडे याच्या खोलीमध्ये आतून दरवाजा लावलेला दिसून आला. काही तरुणांनी खिडकीची काच तोडून पाहिले तर प्रतीक याने गळफास घेतलेला होता. यावेळी विद्यार्थी धावून आले.त्यांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेत दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षक यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली. घटनेची माहिती कळताच पाळधी दुरक्षेत्र पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णालयात येऊन विद्यार्थ्यांकडून आत्महत्याबाबत माहिती घेतली. दरम्यान, प्रतीक गोरडे यानी आत्महत्या का केली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ विभागातून धावणार्‍या 12 रेल्वे गाड्या रद्द

Next Post

कुठलीही परीक्षा न देता पदवीधरांना थेट सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

कुठलीही परीक्षा न देता पदवीधरांना थेट सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

February 23, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांच्या तब्येतीसंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर!

February 23, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

भुसावळमार्गे होळीनिमित्त उधना-मालदा टाउन एक्स्प्रेस धावणार ; तपासून घ्या वेळापत्रक

February 23, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय अन् अर्ज कुठे करावा?

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page