जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्याची चर्चा असून यावरून शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला खुले आव्हान दिले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं. डिपॉझिट ते वाचवू शकत नाही. बाकी काय बोलायचं, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच जळगाव लोकसभा मतदारसंघात या निमित्ताने वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथील विकास कामांच्या सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाषण सुरू असताना अचानक बत्ती गुल झाली. यावेळी भाषण न थांबवता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाईटच आणि माझं जमत नाही हे माझं कायमचं नात आहे असं मिश्किल वक्तव्य केलं.















Discussion about this post