जळगाव – नाशिक जिल्हा सेपक टकारॉ असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य सेपक टकारॉ असोसिएशनच्या मान्यतेने नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात वरिष्ठ गटाच्या ३५ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगाव जिल्हाच्या संघाने सहभाग नोंदवला होता. त्यात जळगाव जिल्ह्याच्या संघाने अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करून टीम इव्हेंट मध्ये कांस्यपदक, आणि डबल इव्हेंट मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.
मुलांच्या संघात शेख फैजान (कर्णधार) अबूजर बागवान ,तन्वीर शहा, फैजान रईस,उमर बागवान,हम्माद बागवान,सय्यद उवेस,शेख रेहान,मोहम्मद अदनान ,सय्यद शिकेब रेहान खान,अमजद मुलानी,सचिन पाटील,अमोल,राहुल यांचा समावेश होता.
विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र सेपक टाकरॉ असोसिएशनचे अध्यक्ष विपीनभाई कामदार , राज्य संघटनेचे सचिव डॉ योगेंद्र,राज्य संघटनेचे अमृता पांडे, वर्धा जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. विनय मून,जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एजाज मलिक, प्रा. चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवलकर, सचिव इक्बाल मिर्झा, प्रशांत जगताप, प्रा. वसीम मिर्झा, शहबाज शेख, आमिर खान तसेच सर्व पदाधिकारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. संघ प्रशिक्षक म्हणून आसिफ मिर्झा, सागर सोनवणे तर संघ व्यवस्थापक म्हणून इमरान शेख व कैफ पठाण यांनी काम पाहिले.















Discussion about this post