मुंबई/जळगाव । महाराष्ट्रातून मॉन्सून परतीच्या मार्गावर असल्याने राज्यात पावसाने उघडीप आहे. राज्यातील अनेक ठिकाणाहून मान्सूनने माघारी घेतली असून असून दुसरीकडे वातावरणात बदल होऊन किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा ताप वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातही मागच्या दोन तीन दिवसात घसरण झालेल्या किमान तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे.
मागच्या काही दिवसापूर्वी जळगाव शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात १६ अंशापर्यंत घसरल्याने रात्री आणि सकाळच्या वेळेस गुलाबी थंडी जाणवत होती. मात्र आता ऐन दिवाळीत जळगावसह राज्यातील हवामानात मोठे बदल झाले असून उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे.
शुक्रवारी जळगावचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान २० अंश सेल्सिअसपर्यंत होते. जळगावकरांना सध्या ऑक्टोबर हिटचा जबरदस्त तडाखा बसताना दिसत असून तापमानात वाढ झाल्याने ऐन दिनाळीच्या दिवसांत उकाड्यामुळे नागरिक अक्षरश: घामाघुम झाले आहेत. दरम्यान, भाऊबीजपर्यंत उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे वाढणारे प्रदूषण उकाड्याची तीव्रता आणखी वाढवू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.















Discussion about this post