जळगाव : यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याची अनुभूती आतापासून जाणविण्यास सुरवात झाली आहे.जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील तापमान आतापासूनच ४२ अंशाच्या वर पोहचले आहे. यामुळे जळगाव जिल्हा उन्हाने तापला असल्याची अनुभूती येण्यास सुरवात झाली आहे.
मागील तीन. चार दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात जळगाव शहरासह जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर जात आहे. उन्हाच्या दाहकतेत नागरिक होळपळून निघत असून, नागरिक उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी दुपारच्यावेळी सावलीचा आधार घेत आहेत. अनेकजण आतापासूनच कुलर, ए.सी. बसवत आहेत. याशिवाय शीतपेयांच्या दुकानावर देखील गर्दी होत आहे.
सर्वच शहरात ४० पार
जळगाव जिल्ह्यातील १५ तालूक्यातील तापमान हे चार दिवसांपूर्वीच ४० अंशाच्या गेले आहे. दरम्यान दोन दिवसांपासून पॅरा ४२ अंशाच्या वर पोहचले असून जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव, रावेर, यावल शहरातील तापमान ४१ अंशावर होते. तर उर्वरित शहरातील तापमान हे ४२ अंशाच्या वर गेले आहे.
Discussion about this post