जळगाव : गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. मंगळवारी तर जळगावात राज्यातील सार्वधिक तापमानाची नोंद झाली. काल ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी जळगाव शहर संपूर्ण राज्यात हॉट ठरलं आहे.
आगामी चार दिवस तरी जळगावकरांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तसेच पारा ४५ ते ४६ अंशांपर्यंत जाण्याचाही अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.
राजस्थान, गुजरातकडून येणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे तापमान वाढतच जात आहे. त्यातच वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणदेखील ६० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने, मोठ्या प्रमाणात उकाडादेखील जाणवत आहे
दरम्यान, आज सकाळी हवामान खात्याने काही तासात जळगावसह अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पहाटे जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
Discussion about this post