जळगाव । गेल्या काही दिवसापासून सूर्य आग ओकू लागला आहे. अवकाळी पावसाचे सावट दूर झाल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील तापमानात सातत्याने वाढ होत असून यामुळे उन्हाच्या तीव्र झळा आता असह्य होऊ लागल्या आहेत. यातच दरम्यान, उद्या सोमवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे.
यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमानात घट झाली होती. मात्र मागील काही दिवसापासून तापमानात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जळगावकरांना बसत आहे.
आज दुपारी ४ वाजेपर्यंत शहारासह जिल्ह्यात ४२ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट कायम आहे.सकाळपासूनच उन्हाच्या प्रचंड झळा बसत आहे. दरम्यान, उद्या सोमवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे.
Discussion about this post