जळगाव । हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात यावर्षी मार्च अखेरीसच उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. येणाऱ्या रविवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी तापमान ४३ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याचे तापमान मे महिन्यात सर्वाधिक कमाल पातळीवर जात असते. 47 ते 48 अंशापर्यंत तापमानात वाढ होते. एप्रील व मे मध्ये दोन महिने जळगाव जिल्हा तापमानाचा उच्चांक गाठतो. मात्र यावर्षी हवामान खात्या विभागाने मार्च च्या शेवटच्या आठवड्यातच तापमानाचा उच्चांक जळगाव जिल्हा गाठणार असल्याचे संकेत दिले आहे. आज जळगाव जिल्ह्याचे तापमान 38.5 किमान आणि कमाल 16.3 होते
यामुळे रविवार पर्यंत हे तापमान 43° पर्यंत जाणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना 11 ते 4 या वेळेस घराबाहेर पडू नये काम असेल तर बाहेर पडावे तसेच आरोग्याच्या संबंधित कोणतीही समस्या असेल संबंधित डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेणे. लहान मुलांनी यावेळेस घराबाहेर पडू नये त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान जिल्ह्याला उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे २६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांची बैठक बोलावली आहे. तापमान चाळीशीपार जाणार असल्याने जिल्ह्यातील नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान या कालावधीत नागरीकांनी काय काळजी घ्यावी यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. त्या अनुषंगाने २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागांच्या अधिकऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.















Discussion about this post