जळगाव । गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात आणि जिल्ह्यातील थंडी कमी झाल्याचे चित्र आहे, तर दिवस जसा सरेल तसा उष्माचा पारा वाढताना दिसत आहे. यामुळे पहाटे काहीशी थंडी तर दुपारी कडक उन्ह अशी एकूण परिस्थिती झाली आहे. यामुळे ऐन थंडीच्या दिवसात उन्हाचे चटके बसण्यास आत्तापासूनच सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे. यामुळे उष्णा अधिक जाणवू लागला आहे. मूळात फेब्रुवारी महिना हा थंडीच्या दिवसांचा महिना समजला जातो. या महिन्यात थंडी कायम राहत असते. मात्र, आत्ताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून कधी थंडीत काहीशी वाढ तर कधी थंडी एकदम कमी होत आहे.
तसेच दुपारच्या वेळी उन्हाळा पार वाढल्याचे दिसते. अशी संमिश्र परिस्थिती सध्या पाहिला मिळत आहे. मंगळवारी जळगावचे किमान तापमान १५ अंशापर्यत तर कमाल तापमान ३४ अंशापर्यंत होते. आता हवामान खात्याने आजपासून १७ फेब्रुवारीपर्यंत तापमान वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यादरम्यान तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंशापर्यंत पोहोचू शकतो.
Discussion about this post