जळगाव | जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनींगच्या मागे परप्रांतीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुरेश सोलंखी ( मूळ राहणार सेंधवा मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.
याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनींगच्या मागे असलेल्या शेतामध्ये जिनिंग असून सुरेश सोलंखी हा तिथे काम करीत होता. आज दुपारी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. भर दिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह पथक घटनांसाठी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथक आणि श्वास पथक घटनास्थळी दाखल झाले असून संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.















Discussion about this post