जळगाव । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु आहे. काही दिवसांवर दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण येऊ ठेपले आहे. मात्र त्यापूर्वीच जळगावच्या सुवर्णबाजारात सोने आणि चांदीने दरवाढीचा धबाडका लावला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचे प्रति तोला 78 हजार 500 रुपयांवर दर पोहचले. तर जीएसटी सह चांदी प्रति किलो 96 हजार 700 रुपयांवर पोहचली आहे. युद्ध जन्य परिस्थितीमुळे सोन्या-चांदीचा दरावर परिणाम झाल्याची माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिले.
चांदीचे दर प्रति किलो एक लाखांपर्यंत पोहोचणार असल्याचा दावा सराफ व्यावसायिकांनी केला आहे. नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीलाच जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्या- चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांची संख्या मंदावल्याचे सुवर्ण व्यवसायिकांचे म्हणणे आहे. सोने चांदीच्या दरात चढ-उतार कायम असल्याने ग्राहक खरेदी करण्यासाठी वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत.















Discussion about this post