जळगाव । राज्यात आजपासून दहावी परीक्षेला सुरुवात झाली आहे. परंतु जळगावमध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. जळगाव शहरातील अनेक दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीबहादरांकडून विद्यार्थ्यांना सर्रास कॉप्या पुरवल्या गेल्या.
एकीकडे कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सतर्क असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांना पहिल्याच पेपरला सर्सास कॉपी पुरवल्या गेल्याचे चित्र पाहायला मिळालं.
काही परीक्षा केंद्रावर तर हद्दच झाली. थेट पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर परीक्षार्थींना कॉपी पुरवताना दिसले. परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासनाचा वचक पाहायला मिळाला नाही.
काही परीक्षा केंद्रांवरून तर शिक्षक वृंद देखील पिशवी घेऊन भिंतीवरून उडी मारत असतानाच चित्र पाहायला मिळाले. परीक्षा केंद्राच्या बाहेर तसेच छतावर कॉप्यांचा ढीग, तर परीक्षा केंद्राबाहेर टवाळखोरांची गर्दी पाहायला मिळाली.
Discussion about this post